
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्राझीलवर ५० टक्के आयातशुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्राझीलचे माजी अध्यक्ष जेर बोल्सेनारो यांना त्यांच्या देशात मिळत असलेल्या खराब वागणुकीमुळेच हे आयातशुल्क लागू केल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले.