PM Narendra Modi : मोदी यांच्या पॉडकास्टने ट्रम्प प्रभावित; ‘ट्रुथ सोशल’वर लिंक शेअर, सत्ता नसतानाही विश्वासाचे नाते
Donald Trump : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लेक्स फ्रिडमन यांच्यासोबतच्या पॉडकास्ट मुलाखतीने डोनाल्ड ट्रम्प प्रभावित झाले. त्यांनी ही मुलाखत आपल्या ‘ट्रुथ सोशल’वर शेअर केली आणि मोदींशी विश्वासाचे नाते असल्याचे स्पष्ट केले.
वॉशिंग्टन : प्रसिद्ध अमेरिकी पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांनी घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीने प्रभावित होऊन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याची लिंक ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया व्यासपीठावर शेअर केली आहे.