Donald Trump: आखाती देशातील नेते ‘व्हाइट हाउस’मध्ये; बहारीनचे युवराज, कतारच्या पंतप्रधानांची ट्रम्प यांच्यासोबत भेट
White House: इस्रायल-सीरिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बहारीन आणि कतारच्या नेत्यांनी ट्रम्प यांची व्हाइट हाउस भेट घेतली. मध्यपूर्वेत शांतता आणि गुंतवणुकीसंदर्भात महत्त्वाच्या चर्चा झाल्या.
वॉशिंग्टन : इस्राईल आणि सीरिया यांच्यात निर्माण झालेल्या ताज्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी व्हाइट हाउसमध्ये दोन आखाती देशातील नेत्यांचे स्वागत केले.