
वॉशिंग्टन : मागील तीन वर्षांपासून सुरू असलेले युक्रेनमधील युद्ध संपविण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांची भेट घेणार असून याबाबत त्यांच्याशी बोलणेही झाले आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज जाहीर केले. युक्रेनला ‘नाटो’मध्ये सहभागी करणे योग्य नसल्याचेही ट्रम्प यावेळी म्हणाले.