
न्यूयॉर्क : ‘‘उद्योजक एलॉन मस्क यांचा नवीन राजकीय पक्ष काढण्याचा प्रयत्न हास्यास्पद असून, तंत्रज्ञान क्षेत्रातील या अब्जाधीशाने पूर्णपणे मार्गच बदलला आहे,’’ अशी टीका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. मस्क यांनी ‘अमेरिका पार्टी’ या पक्षाची घोषणा केल्यानंतर ट्रम्प यांनी ही टीका केली.