
वॉशिंग्टन : रशिया आणि युक्रेन हे तातडीने शस्त्रसंधीसाठी वाटाघाटी सुरू करणार आहेत, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. ट्रम्प यांनी सोमवारी रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन आणि युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली होती.