
वॉशिंग्टन : ‘गाझा पट्टीत डांबून ठेवलेल्या सर्व अपहृतांची सुटका करा, हा अखेरचा इशारा आहे,’ अशा शब्दांत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला धमकावले आहे. अपहृतांच्या सुटकेसाठी इस्राईलला हवी ती मदत करण्याबरोबरच हमासबरोबर थेट चर्चा करण्यासाठी राजदूतही पाठविला असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले.