
वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अन्य देशांवर आयातशुल्क लादण्याचे सूतोवाच करत नवे व्यापार युद्ध छेडले आहे. या नव्या निर्बंधांतून भारताची देखील सुटका होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या आयातशुल्काच्या प्रस्तावित संरचनेबाबत कुणीही माझ्याशी वाद घालू शकत नाही असे विधान ट्रम्प यांनी ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.