अकबरुद्दीन यांनी केली पाकच्या पत्रकारांची बोलती बंद (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

सैय्यद अकबरुद्दीन यांना पत्रकार परिषदेत पाकिस्तानी पत्रकारांनी विचारले, की कधीपासून द्विपक्षीय चर्चेला सुरवात होणार आहे. यावर अकबरुद्दीन यांनी पत्रकारांच्या दिशेने जात त्यांच्याशी हात मिळवणी केली. तसेच शांतता राखण्याचेही आवाहन केले. अकबरुद्दीन यांच्या हजरजबाबी उत्तराने पाकिस्तानच्या पत्रकारांची बोलती बंद झाली. 

न्यूयॉर्क : काश्मीरमधून कलम 370 हटविण्याचा मुद्द्यावरून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर तोंडघशी पडले असून, संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत सैयद अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानी बोलती बंद केल्याचा पाहायला मिळाले. ट्विटरवर अकबरुद्दीन यांच्या कृतीचे कौतुक पाहायला मिळत आहे.

सैय्यद अकबरुद्दीन यांना पत्रकार परिषदेत पाकिस्तानी पत्रकारांनी विचारले, की कधीपासून द्विपक्षीय चर्चेला सुरवात होणार आहे. यावर अकबरुद्दीन यांनी पत्रकारांच्या दिशेने जात त्यांच्याशी हात मिळवणी केली. तसेच शांतता राखण्याचेही आवाहन केले. अकबरुद्दीन यांच्या हजरजबाबी उत्तराने पाकिस्तानच्या पत्रकारांची बोलती बंद झाली. 

काश्मीर प्रश्नावरील चर्चेनंतर सय्यद अकबरुद्दीन यांची पत्रकार परिषद सुरु होती. ज्यात पाकिस्तानचे काही पत्रकारदेखील उपस्थित होते. पाकचे पत्रकार अकबरुद्दीन यांना काश्मीर आणि मानवाधिकार यावरुन प्रश्न विचारण्यात सुरुवात केली. पाकच्या पत्रकारांनी कलम 370 हटविण्यावरुन सय्यद अकबरुद्दीन यांना घेरण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला. कलम 370 मधील सर्वाधिक तरतूदी हटविण्याचा निर्णय भारत सरकारचा आहे आणि भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. तुमच्या मनात कोणतीही शंका नको यासाठी मी पहिल्यांदा 3 पाकिस्तानी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देतो, असे त्यांनी सांगितले. काश्मीर प्रश्नी भारताकडून सर्व आंतरराष्ट्रीय करारांचे योग्य प्रमाणे पालन करण्यात आले आहे. मात्र काही लोक आपल्या विचारसरणीच्या प्रचारासाठी काश्मीरमधील परिस्थिती भयावह असल्याचा दावा करण्यात येत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twitter all praise for Syed Akbaruddins UNSC remarks