
एलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यावर पराग अग्रवाल चिंतेत; म्हणाले...
एलॉन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर्सला ट्विटर खरेदी केलं आहे. त्यामुळे आता ट्विटर ही एक खासगी कंपनी असेल, ज्याचे एकमेव मालक एलॉन मस्क हे असतील. मात्र त्यामुळे आता ट्विटरच्या कर्मचाऱ्यांच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांनी ट्विटरच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांशी बोलताना पराग अग्रवाल यांनी सांगितलं की, लोकांना कामावरून काढायचं की नाही हे अद्याप नियोजित नाही, पण जेव्हा हा सगळा व्यवहार पूर्ण होईल, त्यावेळी काय होईल याबद्दल कोणतंही भाष्य करू शकत नाही. कंपनी आता मस्क यांच्या हातात आहेत.
हेही वाचा: ...अखेर एलॉन मस्क बनले Twitterचे मालक
अग्रवाल म्हणाले की आपल्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरं नाहीत. हा अनिश्चिततेचा काळ आहे. मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर जर अग्रवाल यांना नोकरीवरून काढून टाकलं तर त्यांना ४२ मिलियन डॉलर्स मिळतील, असं सांगण्यात येत आहे. त्यांनी सांगितलं की हा व्यवहार पूर्ण होईपर्यंत ते कंपनीमध्ये असतील. ते म्हणाले की, एकदा का व्यवहार पूर्ण झाला की आपल्याला काहीच कल्पना नाही ही कंपनी कोणत्या दिशेला जाईल.
हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर ट्विटर ही एक खासगी कंपनी होईल आणि कंपनीचं संचालक मंडळ बरखास्त होईल, अशी माहिती ट्विटरच्या स्वतंत्र संचालक मंडळाचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांनी सांगितलं.
Web Title: Twitter Ceo Parag Agrawal Says Future Of Company Is Uncertain
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..