HappyBirthdayPM : मोदींच्या वाढदिवसानिमित्त पाकिस्तानच्या मंत्र्याचे वादग्रस्त ट्विट !

वृत्तसंस्था
Tuesday, 17 September 2019

पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे मंत्री चौधरी फवाद हुसेन यांच्याकडून वादग्रस्त ट्विट ! 

इस्लामाबाद : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. मात्र पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी आजच्या दिवशीदेखील एक वादग्रस्त ट्विट केलं आहे.त्यामुळे फक्त भारतातूनच नाही तर पाकिस्तान जनतेच्या टीकेला त्यांना सामोरं जावं लागत आहे. ट्विटरवर या विधानाचा विरोध केला जात आहे. 

हुसेन यांनी ट्विट करताना लिहिलं आहे की," आजचा दिवस आम्हाला गर्भनिरोधाचे महत्तव काय याची आठवण करुन देतो". या ट्विटपुढे त्यांनी  #ModiBirthday असा हॅशटॅगही वापरला आहे. त्यानंतर मात्र हुसेन यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्यावर मीम्सदेखील तय़ार केले आहेत. पाकच्या नागरिकांकडूनही या ट्विटला विरोध होताना दिसला. चांद्रयान-2 चा संपर्क तुटल्यावरही फवाद य़ांनी अशाच प्रकारे वादग्रस्त ट्विट केलं होतं. तेव्हा ते म्हणाले होते की ," जे काम जमत नाही ते करु नये ...डिअर इंडिया." 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 69 वा वाढदिवस आहे. यानिनित्ताने त्यांना देशासह जगभरातूनही शुभेच्छा मिळत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twitter slam Pak Minister Fawad Chaudhry s despicable tweet on PM Modi s birthday