
एकूणच या घटनेचा तपास काबूल पोलिस करत असल्याची माहिती मिळत आहे.
काबूल पुन्हा हादरलं! स्फोटात सहा जणांचा मृत्यू, 14 जखमी
अफगाणिस्तानं मधील काबूल शहर स्फोटांनी हादरलं आहे. काबूलच्या पश्चिमेला आज सकाळी दोन स्फोट झाल्याची माहिती मिळाली. शिया समुदायाला लक्ष करत आत्मघातकी हल्लेखोरांकडून हे स्फोट करण्यात आले आहेत. शहरातील अब्दुल रहीम शहीद हायस्कूलजवळ झालेल्या स्फोटांची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली असून या घटनेची चौकशी सुरू झाली आहे. या स्फोटात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती मिळत आहे.
हेही वाचा: छत्तीसगढमध्ये उभारणार कोळसा खाणी; राऊतांची मुख्यमंत्र्यांशी भेट
अगाणिस्तान येथील परिस्थिती काही अंशी शांततेची होत असताना आता पुन्हा एकदा या घटनेनं काबूल शहर हादरलं आहे. शिया समुदायाला लक्ष करत आत्मघातकी हल्लेखोरांकडून हे स्फोट करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. काबूल आणि अफगाणिस्तान येथील परिस्थिती काही निवळत असताना आता पुन्हा एकदा शिया समुदायावर हल्ला करण्यासाठी हे पाऊल उचललं असल्याची माहिती काबूल पोलिसांनी दिली आहे. या स्फोट एका प्रशिक्षण केंद्राजवळ आणि शाळेजवळ हे स्फोट झाले आहेत. या शाळेतील मुलं घरी परतत असताना चार ते पाच आत्मघातकी हल्ले करण्यात आले आहेत. एकूणच या घटनेचा तपास काबूल पोलिस करत असल्याची माहिती मिळत आहे.
Web Title: Two Blasts In West Of Kabul Afghanistan Investigation Has Started Into The Incident
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..