Video: दोन फूट नवरा अन् सहा फूट नवरीचा प्रेमविवाह...

वृत्तसंस्था
Thursday, 28 November 2019

दोन फुटाचा नवरा आणि सहा फूट उंच असलेल्या नवरीचा विवाह सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. परंतु, चर्चा झाली त्या दोघांच्या उंचीची. नवदांपत्य पाकिस्तानमधील असून, त्यांचा प्रेमविवाह आहे. विवाहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कराचीः दोन फुटाचा नवरा आणि सहा फूट उंच असलेल्या नवरीचा विवाह सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. परंतु, चर्चा झाली त्या दोघांच्या उंचीची. नवदांपत्य पाकिस्तानमधील असून, त्यांचा प्रेमविवाह आहे. विवाहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाकिस्तानमध्ये दोघांच्या प्रेमविवाहाची चर्चा रंगली आहे. बुरहान चिश्तीची उंची दोन फूट आहे. सहा फुट उंच असलेल्या फौजियासोबत त्याचे प्रेमसंबंध होते. दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि मोठ्या थाटात नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला 13 देशांमधील नागरिक उपस्थित होते. विवाह सोहळा संपन्न होत असताना अनेकांनी मोबाईलमध्ये छायाचित्र घेत व्हिडिओ शूट केले. सोशल मीडियावर दोघांची छायाचित्र व व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

चिश्तीला लोक प्रेमाने बोबो असे म्हणतात. बोबोला पोलिओ झाला होता. लहानपणापासून तो ओस्लोमध्ये राहतो. बोबो नॉर्वेमध्ये अभिनेता सलमान खानच्या बीइंग ह्यूमन कॅम्पेनचे प्रतिनिधीत्व करतो. बोबोला 2017 मध्ये मोस्ट इंस्पिरेशनल मॅन असा पुरस्कार मिळाला आहे. फौजिया पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील राहणारी आहे. दोघे एकमेकाच्या संपर्कात होते. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि विवाह केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two foot tall man gets married to six feet tall video viral