धक्कादायक! पाक उच्चायुक्तामध्ये कार्यरत दोन भारतीय अधिकारी गायब

टीम ई-सकाळ
Monday, 15 June 2020

भारतीय मिशनने यासंबंधीची तक्रार पाकिस्तानकडे केली असून पाकिस्तानी परराष्ट्रमंत्रालयाने याची दखल घेतली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले असताना या घटनेने ते अधिक बिघडण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली- पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तात काम करणारे दोन भारतीय अधिकारी गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. एएनआयने यासंबंधीचे वृत्त दिले असून दोन्ही अधिकारी गेल्या काही तासांपासून बेपत्ता असल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपासून पाकिस्तानी गुप्तचर भारतीय अधिकाऱ्यांचा पाठलाग आणि त्यांना त्रास देत असल्याचे वृत्त येत होते. त्यानंतर आज दोन अधिकारी गायब झाल्याने खळबळ उडाली आहे.

कोरोनावरील लस वर्षाखेरपर्यंत शक्य

तसेच गेल्या काही दिवसांपासून आयएसआयच्या गुप्तचरांचा भारतीय उच्चायुक्त गौरव अहलुवालीया यांच्या निवासस्थानातील वावर वाढला होता. पाकिस्तानी अधिकारी दिल्लीच्या परिसरात हेरगिरी करत असताना त्यांना भारतीय पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पकडले होते. त्यानंतर त्यांना परत पाकिस्तानमध्ये पाठवण्यात आले होते. याच्या पार्श्वभूमीवर दोन अधिकारी बेपत्ता होण्याची घटना घडली आहे.

चीन पाठोपाठ नेपाळचे फुत्कार, भारताची जमीन दाखवली आपल्या नकाशावर

साऊथ ब्लॉक या घटनेकडे लक्ष ठेवून आहे. भारतीय मिशनने यासंबंधीची तक्रार पाकिस्तानकडे केली आहे. तसेच पाकिस्तानी परराष्ट्रमंत्रालयाने याची दखल घेतली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले असताना या घटनेने ते अधिक बिघडण्याची शक्यता आहे. दरम्यान, दोन पाकिस्तानी अधिकारी दिल्लीच्या परिसरात हेरगिरी करताना सापडले होते. भारताने या दोन्ही अधिकाऱ्यांना पाकिस्तानमध्ये परत पाठवले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Indian officials working at Indian Mission in Islamabad go missing