Israeli Embassy Attack : इस्रायली कर्मचाऱ्यांवर गोळीबार; अमेरिकेत दोघांचा मृत्यू, पॅलेस्टाइनसमर्थक हल्लेखोर ताब्यात
Washington News : वॉशिंग्टनमधील इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला असून ते ठार झाले. हल्लेखोराने ‘पॅलेस्टाइन मुक्त करा’ अशा घोषणा दिल्या.
वॉशिंग्टन : इस्राईल- पॅलेस्टाइन वादाचे पडसाद आज अमेरिकेतही उमटले. वॉशिंग्टनमधील इस्राईलच्या दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांवर एका हल्लेखोराने आज गोळीबार केला. या गोळीबारात दोघेही ठार झाले.