दोन लाख मुलांना रशियात नेले - व्होलोदीमिर झेलेन्स्की | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Two million children taken to Russia Volodymyr Zelensky Allegations against Putin
दोन लाख मुलांना रशियात नेले - व्होलोदीमिर झेलेन्स्की

दोन लाख मुलांना रशियात नेले - व्होलोदीमिर झेलेन्स्की

किव्ह : ‘रशियाने केलेल्या आक्रमणामुळे युक्रेनमधील लाखो लोक विस्थापित झाले असून अनेकांना बळजबरीने रशियात नेण्यात आले आहे. या रशियात नेलेल्या लोकांमध्ये दोन लाखांहून अधिक बालकांचा समावेश असून त्यांना प्रचंड मोठ्या रशियात विविध ठिकाणी पाठवून देण्यात आले आहे,’ असा आरोप युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी केला. व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे रशियावर आरोप केले आहेत. ते म्हणाले की,‘युक्रेनच्या वीस टक्के भागावर रशियाचा सध्या ताबा आहे.

रशियाच्या हल्ल्यांमुळे सुमारे दीड कोटी युक्रेनी नागरिकांना घर सोडावे लागले असून ६८ लाख लोकांना तर देश सोडावा लागला आहे. रशियाने लाखो लोकांना बळजबरीने त्यांच्या देशात नेले असून त्यामध्ये दोन लाखांहून अधिक बालकांचा समावेश आहे. रशियन सैनिकांनी अनाथालयांमधील, हल्ल्यांमुळे पालकांपासून दूर झालेल्या बालकांना रशियात नेले असून अनेक बालकांना पालकांपासून बळजबरीनेही दूर नेण्यात आले आहे. या सर्वांनी युक्रेनला विसरून जावे आणि त्यांना परत येणे अशक्य होऊन जावे, हेच क्रूर धोरण यामागे आहे.’

ब्रिटन देणार रॉकेट यंत्रणा

लंडन : युक्रेनला मध्यम पल्ल्याचा मारा करण्याची क्षमता असलेली रॉकेट यंत्रणा देणार असल्याचे ब्रिटनने आज जाहीर केले. ब्रिटनकडून युक्रेनला एम-२७० रॉकेट मिळणार असले तरी त्यांची संख्या जाहीर करण्यात आलेली नाही. अमेरिकाही युक्रेनला ८० किमीचा पल्ला असलेले रॉकेट पुरविणार आहे. स्लोव्होकियाही युक्रेनला आठ हॉवित्झर तोफा पुरविणार आहे.

युद्धाच्या आघाडीवर

  • युक्रेनच्या पूर्वभागावर रशियाचे आक्रमण

  • अमेरिका युद्धात तेल ओतत असल्याचा रशियाचा आरोप

  • युक्रेनला मदत करणे हाच हेतू, त्याद्वारे रशियावर हल्ला करायचा नाही : अमेरिका

  • खारकिव्ह येथील शाळेवर रशियाचे बाँबहल्ले

  • लव्हिव परिसरातही हल्ले, चर्चवरील हल्ल्यात तिघांचा मृत्यू

  • रशियाची अर्थव्यवस्था धोक्यात असल्याचा अर्थमंत्र्यांचा इशारा

युक्रेनमधील आमच्या बालकांना आमच्यापासून हिरावून घेणाऱ्यांना आम्ही नक्कीच धडा शिकवू. युक्रेनवर विजय मिळविणे अशक्य आहे, हे आम्ही सिद्ध करून दाखवू. आम्ही शरण जाणार नाही.

- व्होलोदीमिर झेलेन्स्की, युक्रेनचे अध्यक्ष

Web Title: Two Million Children Taken To Russia Volodymyr Zelensky Allegations Against Putin

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top