
लंडन : संसदीय शिष्टमंडळ म्हणून इस्राईलला गेलेल्या ब्रिटनच्या दोन खासदारांना आज इस्राईल पोलिसांनी देशात प्रवेश नाकारत ताब्यात घेतले. इस्राईल आणि येथील जनतेविरोधात द्वेषमूलक प्रचार करण्याचा त्यांचा डाव होता, असा दावा इस्राईलने केला आहे. ब्रिटनने मात्र या कृतीबद्दल इस्राईलचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.