UAE चे अध्यक्ष शेख खलिफा यांचे निधन, 40 दिवसांचा दुखवटा जाहीर

देशातील सर्व खासगी आणि सरकारी क्षेत्रात तीन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आला आहे.
United Arab Emirates President Sheikh Khalifa Bin Zayed Al Nahyan has died
United Arab Emirates President Sheikh Khalifa Bin Zayed Al Nahyan has diedSakal

दुबई : संयुक्त अरब अमीरातचे (UAE) अध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान (heikh Halifa Bin Zayed Al Nahyan) यांचे निधन झाले आहे. UAE ची अधिकृत वृत्तसंस्था WAM ने याला दुजोरा दिला आहे. नाहयान 73 वर्षांचे होते. झायेद अल नाहायन यांच्या निधनाबद्दल सरकारने 40 दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. याशिवाय देशातील सर्व खासगी आणि सरकारी क्षेत्रात तीन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आला आहे. (UAE President Sheikh Halifa Bin Zayed Al Nahyan Passes Away)

शेख खलिफा बिन झायेद अल नाहायान यांनी 3 नोव्हेंबर 2004 पासून देशाचे राष्ट्राध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक म्हणून पदभार स्वीकारला. त्याआधी त्यांचे वडील शेख झायेद बिन सुलतान अल नाहयान राष्ट्राध्यक्ष होते. 1971 ते नोव्हेंबर 2004 पर्यंत ते देशाचे प्रमुख होते. 1948 मध्ये जन्मलेले शेख खलिफा हे UAE चे दुसरे राष्ट्रपती आणि अबू धाबीचे 16 वे शासक होते. आपल्या कार्यकाळात, शेख खलिफा यांनी UAE आणि अबूधाबीच्या प्रशासनाची पुनर्रचना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि अनेक सुधारणा अंमलात आणल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com