समलैंगिक संबंधात अडथळा आणल्यामुळे पत्नीची हत्या

वृत्तसंस्था
बुधवार, 5 डिसेंबर 2018

ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या समलैंगिक जोडीदारासोबत राहता यावे यासाठी पत्नीची हत्या करणाऱ्या भारतीय वंशाच्या पतीला इंग्लंडमधील न्यायालयाने दोषी ठरवले आहे. मितेश पटेल (वय 37) असे या आरोपीचे नाव असून मितेशच्या आयफोनमधील हेल्थ अॅपमुळे त्याचे बिंग फुटले आहे. मिडल्सब्रो येथे राहणाऱ्या मितेश पटेलने मे महिन्यात पत्नीची हत्या केली होती. सुरुवातीला मितेशने घरात चोरटे घुसल्याचा कांगावा केला होता. हे सर्व खरे वाटावे यासाठी त्याने घरातील कपाटातील कपडे बाहेर काढून फेकले होते.

मिडल्सब्रो- ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या समलैंगिक जोडीदारासोबत राहता यावे यासाठी पत्नीची हत्या करणाऱ्या भारतीय वंशाच्या पतीला इंग्लंडमधील न्यायालयाने दोषी ठरवले आहे. मितेश पटेल (वय 37) असे या आरोपीचे नाव असून मितेशच्या आयफोनमधील हेल्थ अॅपमुळे त्याचे बिंग फुटले आहे. मिडल्सब्रो येथे राहणाऱ्या मितेश पटेलने मे महिन्यात पत्नीची हत्या केली होती. सुरुवातीला मितेशने घरात चोरटे घुसल्याचा कांगावा केला होता. हे सर्व खरे वाटावे यासाठी त्याने घरातील कपाटातील कपडे बाहेर काढून फेकले होते.

मितेश आणि जेसिकाच्या लग्नाला सहा वर्षे झाली होती. दोघेही फार्मासिस्ट म्हणून काम करायचे. पण मितेश वैवाहिक आयुष्यात आनंदात नव्हता. तो समलैंगिक होता. मात्र, दबावापोटी त्याने जेसिकाशी लग्न केले होते. लग्नानंतरही मितेशचे डेटिंग अॅपद्वारे अनेक पुरुषांच्या संपर्कात होता. यातील काही जण त्याच्या घरी देखील आले होते. यादरम्यानच्या काळात मितेश डॉ. अमित पटेलच्या संपर्कात आला. मितेशलाही अमितसोबत सिडनीत राहायचे होते. यासाठी त्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला.

पोलिस तपासात त्याने गुगलवर पत्नीची हत्या कशी करायची, असं सर्च देखील केल्याचे स्पष्ट झाले. संशय येऊ नये म्हणून हत्या केल्यानंतर तो घराबाहेर गेला. मी वॉकला बाहेर गेलो आणि येताना खाद्यपदार्थ घेऊन आलो. यादरम्यान चोरट्यांनी घरात घुसून पत्नीची हत्या केली, असा कांगावा त्याने केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uk Mitesh Patel Found Guilty In Wife Murder Start New Life With Gay Partner