esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

home quarantine

आता ब्रिटनच्या नागरिकांनाही भारतात आल्यावर व्हावं लागणार क्वारंटाईन

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी ब्रिटनने प्रवासादर्भात नव्याने मार्गदर्शन सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार आफ्रिकी आणि दक्षिण अमेरिकी देशात लस घेतलेल्या नागरिकांना ब्रिटनमध्ये आल्यानंतर दहा दिवस विलगीकरणात राहणे बंधनकारक केले आहे. त्याचबरोबर आरटीपीसीआर चाचणी देखली अनिवार्य आहे. या देशात भारत, रशिया, सौदी अरेबिया, तुर्कस्तान, जॉर्डन यांचाही समावेश आहे. त्यानंतर आता भारतानेही ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या ब्रिटीश नागरिकांवर कोरोना निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियम 4 ऑक्टोबरपासून लागू होतील. त्यानुसार ब्रिटनहून येणाऱ्या सर्वांना हे नियम लागू होतील. भारतात येणाऱ्या ब्रिटनच्या नागरिकांनाही आता सक्तीने क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. कमीतकमी 10 दिवस घरी किंवा क्वारंटाईन सेंटरमध्ये क्वारंटाईन व्हावं लागेल, अशी माहिती सुत्रांकरवी मिळत आहे.

लसीकरण झालेले असो अथवा नसो, 4 ऑक्टोबरपासून ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या सर्व ब्रिटीश नागरिकांना प्रवासापूर्वी 72 तासांच्या आतील प्रस्थानपूर्व कोविड -19 आरटी-पीसीआर चाचणी करावी लागेल. त्यानंतर विमानतळावर आगमन झाल्यावर आरटी-पीसीआर चाचणी आणि त्यानंतर आगमनानंतरच्या 8 व्या दिवशी आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक असेल.

ब्रिटनचे नवे प्रवास धोरण

ब्रिटनच्या नवीन नियमानुसार दोन्ही डोस घेतल्यानंतरही प्रवासी भारतीयांना लस घेतलेले समजले जाणार नाही. त्यांना दहा दिवस विलगीकरणात राहवे लागेल. एखादी व्यक्ती आफ्रिका, दक्षिण अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, भारत, तुर्कस्तान, जॉर्डन, थायलंड, रशियासह अन्य देशातून लस घेऊन ब्रिटनमध्ये आली तरी त्यांना लस न घेतलेले नागरिक म्हणून समजले जाईल.

ब्रिटनचा प्रवास करण्यापूर्वी

  • ब्रिटनला जाण्यापूर्वी तीन दिवस अगोदर चाचणी करावी लागेल

  • ब्रिटनला पोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी आणि आठव्या दिवशी चाचणी. याचे पैसे आपल्यालाच द्यावे लागेल

  • प्रवासाच्या ४८ तासाच्या आत प्रवाशांनी आपल्या राहण्याच्या ठिकाणाचा अर्ज भरावा.

ब्रिटनला गेल्यानंतर

  • घरी किंवा ज्या ठिकाणी अपाण आहात तेथे दहा दिवस विलगीकरणात राहणे

  • दुसऱ्या आणि आठव्या दिवशी चाचणी करणे

ब्रिटनचे निकष

  • ब्रिटनच्या सरकारकडून पूर्ण लस घेतलेल्या व्यक्तीला पुढील प्रमाणे अट पाळण्याची गरज नाही

  • प्रवासापूर्वी कोविड चाचणी

  • आठव्या दिवशी कोविड चाचणी

  • ब्रिटनला पोचल्यानंतर दहा दिवस विलगीकरणात राहणे

loading image
go to top