अवयवदानात इंग्लंड करणार भारताला सहकार्य

वृत्तसंस्था
रविवार, 5 ऑगस्ट 2018

इंग्लंड सरकारने या निर्णयाची सध्या घोषणा केली आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास 2020 पर्यंत कालावधी लागण्याची शक्यता आहे. या नव्या अंदाजित संमती प्रणालीनुसार, ज्यांना अवयवदान करण्याची इच्छा नाही. अशा लोकांनी त्यांचा निर्णय राज्य-अनुदानित राष्ट्रीय आरोग्य सेवा (एनएचएस) अवयव दाता रजिस्टरकडे (ओडीआर) द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

लंडन : 'युनायटेड किंग्डम' (इंग्लंड) सरकारने अवयवदानाबाबतच्या नव्या नियमाची आज (रविवार) घोषणा केली. यामध्ये भारतातील गरजू व्यक्तीला इंग्लंड सरकारकडून त्वरीत मदत व्हावी, यासाठी इंग्लंड सरकारकडून अवयवदानाच्या कायद्यात बदल करण्यात येणार अाहे. याबाबतचा विचार येथील सरकारकडून करण्यात येत आहे. 

इंग्लंड सरकारने या निर्णयाची सध्या घोषणा केली आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास 2020 पर्यंत कालावधी लागण्याची शक्यता आहे. या नव्या अंदाजित संमती प्रणालीनुसार, ज्यांना अवयवदान करण्याची इच्छा नाही. अशा लोकांनी त्यांचा निर्णय राज्य-अनुदानित राष्ट्रीय आरोग्य सेवा (एनएचएस) अवयव दाता रजिस्टरकडे (ओडीआर) द्यावा, असेही त्यांनी सांगितले. तसेच अवयवदान ही प्रत्येकाची वैयक्तिक इच्छा असेल. त्यामुळे त्यांच्या या निर्णयामुळे अत्यंत योग्य भूमिका बजावता येईल, असे इंग्लंडच्या संसदीय राज्य सचिव जॅकी डॉयल-प्राईस यांनी सांगितले.

दरम्यान, इंग्लंड सरकारच्या या निर्णयामुळे भारतातील गरजू रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UK plans to change law for organ donation to address urgent need among Indian origin people