रशियन अणु बाॅम्बर Tu-95 सीमेजवळ येताच ब्रिटनच्या टायफून विमानांचे उड्डाण | Russia And Britain | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RAF Typhoon Jet Fighter

रशियन अणु बाॅम्बर Tu-95 सीमेजवळ येताच ब्रिटनच्या टायफून विमानांचे उड्डाण

लंडन : पूर्व युरोपात रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरु असलेल्या तणावादरम्यान अणुबाॅम्ब डागण्यास सक्षम रशियन बाॅम्बर Tu-95 स्काॅटलँडमधील ब्रिटनच्या सीमेजवळ पोहोचले. रशियाचे (Russia) विमाने येत असल्याचे पाहाताच ब्रिटनने (Britain) आपले सर्वात विध्वंसक टायफून विमानांना (RAF's Typhoon Jet Fighter) रशियाच्या बाॅम्बरच्या पाठीमागे लावले. सांगितले जाते की Tu-95 बाॅम्बर आणि दोन सागरी निगराणी विमाने तू-१४२ ब्रिटन जवळील उत्तर समुद्रात पोहोचले होते. बुधवारी झालेल्या घटनेत काही मिनिटांपर्यंत विरोध झाला आणि त्यानंतर रशियन विमाने ब्रिटनच्या हवाई सीमेत प्रवेश करण्यापूर्वीच परतले. रशियन युद्ध विमाने ब्रिटनच्या जवळ अशा वेळी पोहोचले होते जेव्हा काही तासांपूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सनने रशियन राष्ट्रपतींशी युक्रेन संकटावर संवाद साधला होता. रशियन व्हिडिओने कळते की जाॅन्सन हे युक्रेनमधून परतल्यानंतर ही रशियन विमाने ब्रिटिश सीमेजवळ पोहोचली.(UK Raf Typhoon Scramble To Intercept Russian Nuclear Bombers Tu 95)

हेही वाचा: पाकिस्तानमध्ये लष्कारावर मोठा दहशतवादी हल्ला, चार दहशतवादी ठार

तेल भरण्याचा सराव

बोरिस जाॅन्सनने युक्रेन दौऱ्यापूर्वी रशियाला इशारा दिला होता, की पुतिन यांनी जर हल्ला केला तर विनाशकारी चुक होईल. या व्हिडिओत दिसते की ब्रिटनचे टायफून विमान रशियन विमानांजवळून उडत आहेत. युक्रेन आणि इतर मुद्द्यांवरुन रशिया आणि ब्रिटनचे संबंध खूप तणावपूर्ण आहेत. दुसरीकडे रशियाने सांगितले की Tu-95 बाॅम्बर हवेत तेल भरण्याचा सराव करित होते.

Web Title: Uk Raf Typhoon Scramble To Intercept Russian Nuclear Bombers Tu 95

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :britainRussiaUkraine
go to top