UK Supreme Court : तृतीयपंथी व्यक्तीला स्त्री मानता येणार नाही; ब्रिटनमधील सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
Transgender Rights : ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयाने तृतीयपंथी व्यक्तींना जैविकदृष्ट्या स्त्री मानण्याबाबत ऐतिहासिक निकाल दिला आहे. समतेच्या कायद्यानुसार स्त्री असलेल्या तृतीयपंथी व्यक्तींना महिलेसमान अधिकार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
लंडन : ब्रिटनमधील समतेच्या कायद्यानुसार जी व्यक्ती जैविकदृष्ट्या स्त्री म्हणून जन्माला आलेली आहे, तीच महिला आहे, असा निकाल येथील सर्वोच्च न्यायालयाने आज दिला.