Video: मॉडेलने केलं कुत्र्याशी लग्न; टीव्हीवर थेट प्रक्षेपण!

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

एका प्रसिद्ध मॉडेलने नुकताच विवाह केला आहे. पण, युवकाशी नव्हे तर चक्क कुत्र्यासोबत केला आहे.

लंडनः एका प्रसिद्ध मॉडेलने नुकताच विवाह केला आहे. मॉडेलचा विवाह म्हटल्यानंतर नवरदेव कोण असणार? याकडे लक्ष जाते. मात्र, या मॉडेलने विवाह युवकाशी नव्हे तर चक्क कुत्र्यासोबत केला आहे. विशेष म्हणजे या विवाहाचे थेट प्रक्षेपण टीव्हीवरून दाखवण्यात आले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

मॉडेलचे नाव एलिजाबेथ होड (वय 49) असे असून, कुत्र्याचे नाव लोगन असे आहे. हा कुत्रा गोल्डन रिट्रिवर प्रजातीचा असून, सहा वर्षांचा आहे. जगभरातील अनेकांनी हा विवाह सोहळा पाहिला आहे. ब्रिटनमधील प्रसिद्ध टीव्ही शो 'द मॉर्निंग'ने हा विवाह सोहळा लाइव्ह टेलिकास्ट केला होता. अनेकजण हा विवाह सोहळा पाहून हैराण झाले आहेत. अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. 'द मॉर्निंग'ने आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून एलिझाबेथच्या लग्नाचा व्हिडीओ शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला सव्वा पाच लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. शिवाय, हजारो जणांनी रिट्विट्स व लाईक्स केले आहे.
 
एलिजाबेथ होड ही इंग्लंडच्या एस्कॉटपैकी एक आहे. 80च्या दशकातील प्रसिद्ध स्विमसूट मॉडल असून, अनेकांसोबत तिचे नाव जोडले गेले होते. तिनेही 200 पेक्षा जास्त जणांसोबत डेट केले होते. तिला 25 वर्षांचा एक मुलगाही आहे. एलिजाबेथ म्हणाली, 'आयुष्यभराचा सोबती म्हणून कुठल्याही पुरुषाची गरज नाही. पुढील आयुष्य लोगनसोबत घालवणार आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UK woman marries her dog on live TV