युक्रेन प्लुटोनिअम 'डर्टी बॉम्ब'च्या तयारीत; रशियाचा खळबळजनक दावा

रशियानं युक्रेनवर आक्रमण केलं असून सध्या तात्पुरत्या स्वरुपात शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही या दोन्ही देशांमधील कटुता कमी झालेली नाही.
Russia ukraine war
Russia ukraine war Sakal
Updated on

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धाच्या (Ukraine Russia War) पार्श्वभूमीवर रशियानं युक्रेनवर विविध आरोपही केले जात आहेत. युक्रेनकडून प्लुटोनियमवर आधारित 'डर्टी बॉम्ब' (Dirty Bomb) (अण्वस्त्र) बनवण्याच्या तयारीत आहे, असा खळबळजनक आरोप रशियानं केला आहे. रशियन मीडियानं कुठल्याही सुत्रांच्या माहितीशिवाय आणि कोणत्याही पुराव्याशिवाय हे आवाहन केलं आहे. त्यामुळं त्यांचा हा केवळ प्रोपोगंडा असल्याचं बोललं जात आहे. (Ukraine making plutonium based nuclear dirty bomb claims Russia)

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, TASS, RIA आणि Interfax या वृत्तसंस्थांनी सुत्रांच्या हवाल्यानुसार असं म्हणतं युक्रेनकडून चर्नोबिल न्युक्लीअर पॉवर प्लान्टमध्ये अण्वस्त्र विकसित करण्यास सुरुवात केली होती. पण हा प्रकल्प सन २००० मध्ये बंद झाला असं म्हटलं आहे.

Russia ukraine war
'ऑपरेशन गंगा' चा विधानसभा निवडणुकांवर सकारात्मक परिणाम - अमित शाह

युक्रेनवरील आक्रमणाची घोषणा करण्यापूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटलं होतं की, "कीव्ह शहरानं सोव्हिअतचा वापर करुन स्वतः अण्वस्त्र कशी तयार करायची हे शिकून घेतलं. त्यानंतर त्याचाच वापर रशियाविरोधात करायचा त्यांचा डाव होता" पण पुतिन यांच्या या दाव्याला कुठलाही आधार नाही.

Russia ukraine war
अमृतसर : BSFच्या मेसवर गोळीबार; पाच जवान ठार, अनेक जखमी

पुतिन यांनी २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर आक्रमणाचे आदेश दिले होते. पश्चिमीकडील असैनिकीकरण करणं तसेच युक्रेनला नाटोमध्ये सामिल होण्यापासून रोखण्याच्या हेतूनं हे आक्रमण करण्यात आल्याचं रशियानं म्हटलं होतं. दरम्यान, युक्रेनच्या सरकारनं यापूर्वीच स्पष्ट केलं की, आमचा पुन्हा न्युक्लिअर क्लबमध्ये समाविष्ट होण्याचा कुठलाही मानस नाही. सन १९९४ मध्ये सोव्हियत युनियनमधून बाहेर पडल्यानंतर युक्रेननं आपल्याकडी सर्व अण्वस्त्रांचं समर्पण केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com