UN experts slam Pakistan: हिंदू-ख्रिश्चन महिलांचे सक्तीने विवाह अन् धर्मांतर; संयुक्त राष्ट्रसंघाने पाकिस्तानला फटकारलं

UN experts slam Pakistan: संयुक्त राष्ट्रांच्या (UN) तज्ज्ञांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'ख्रिश्चन आणि हिंदू मुलींना सक्तीचे धर्मांतर, अपहरण, तस्करी, बालविवाह, जबरदस्ती विवाह, घरगुती गुलामगिरी आणि लैंगिक हिंसाचाराचा सामना करावा लागतो.'
UN experts slam Pakistan
UN experts slam PakistanEsakal

UN experts slam Pakistan: अल्पसंख्याक महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून पाकिस्तान पुन्हा एकदा निशाण्यावर आला आहे. हिंदू आणि ख्रिश्चन महिलांना पुरेसे संरक्षण न दिल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांनी इस्लामाबादवर टीका केली आहे. पाकिस्तानमधील अल्पसंख्याक समुदायातील तरुण महिला आणि मुलींना संरक्षण मिळत नसल्याबद्दल विशेषतः ख्रिश्चन आणि हिंदू समुदाय संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांनी निराशा व्यक्त केली.

ते म्हणाले की, देशाने संबंधित आंतरराष्ट्रीय करारांनुसार आपली जबाबदारी पूर्ण करणे आवश्यक आहे. देशातील प्रत्येक घटकाला समान अधिकार मिळावेत.

संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांनी सांगितले की, 'ख्रिश्चन आणि हिंदू मुलींना जबरदस्तीने धर्मांतर, अपहरण, तस्करी, बालविवाह, बळजबरी विवाह, घरगुती गुलामगिरी आणि लैंगिक हिंसाचाराचा सामना करावा लागतो.' धार्मिक अल्पसंख्याक समुदायातील महिला आणि मुलींशी अशी वागणूक समर्थनीय ठरू शकत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा सर्व घटना तात्काळ थांबवायला हव्यात.

UN experts slam Pakistan
Pakistan Police Clash With Pak Army: पाकिस्तानी लष्कराचा पंजाब पोलिस स्टेशनवर हल्ला, अनेकांना बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

'जबरदस्तीच्या धर्मांतराच्या घटना थांबवण्याची गरज'

तज्ज्ञांनी सांगितले की, करारांनुसार पाकिस्तानला आपली जबाबदारी पाळावी लागेल. तसेच सक्तीच्या धर्मांतराच्या घटना थांबवण्याची गरज आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतात पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेजवळ एक ऐतिहासिक हिंदू मंदिर पाडण्यात आल्याच्या वेळी तज्ज्ञांनी इस्लामाबादला फटकारले आहे.

UN experts slam Pakistan
Pakistan News : कराचीतल्या रस्त्यांवर ४ लाख प्रोफेशनल भिकारी; मॉल्स, मार्केट अन् ट्रॅफिक सिग्नल्सना घेरा

तसेच, या जागेवर व्यावसायिक संकुलाचे बांधकाम सुरू झाले आहे, जे 1947 पासून मूळ रहिवासी भारतात स्थलांतरित झाल्यानंतर बंद होते. 'खैबर मंदिर' खैबर जिल्ह्यातील लेंडी कोटल बाजार या सीमावर्ती शहरात वसले होते, परंतु गेल्या काही वर्षांत ते हळूहळू नाहीसे होत होते. सुमारे 10-15 दिवसांपूर्वी या ठिकाणी बांधकाम सुरू झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com