
न्यूयॉर्क (पीटीआय) : इस्राईल आणि हमास यांच्या संघर्षात गाझातील जनता होरपळून निघत असताना संयुक्त राष्ट्राच्या महासभेत दोन महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. गाझा पट्टीत तात्काळ शस्त्रसंधी लागू करणे, हमास आणि अन्य गटांच्या ताब्यात असलेल्या ओलिसांची तत्काळ सुटका करणे असा मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आला.