भारताचा टोला : शेजाऱ्यांनी दहशतवाद्यांना आश्रय दिला

गुन्हेगारी-दहशतवाद साटेलोटे तोडण्याचे आवाहन
un india criticize country Gave shelter to terrorists crime-terrorist network
un india criticize country Gave shelter to terrorists crime-terrorist networksakal

न्यूयॉर्क : ‘संघटित गुन्हेगारांनी दहशतवादाकडे वळणे आणि त्यांना संयुक्त राष्ट्रांनी काळ्या यादीत टाकल्यानंतरही आमच्या शेजारी देशाने त्यांना राजाश्रय देणे, या गोष्टीचा आम्हाला थेट अनुभव आहे,’ असा टोला आज भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये लगावला. यावेळी भारताचा रोख पाकिस्तानात राहणाऱ्या कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या दिशेने होता. ‘दहशतवादामुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि शांततेसमोर असलेला धोका’ या विषयावर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीमध्ये आज बैठक झाली. या बैठकीत भारताच्या कायमस्वरुपी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी संघटित गुन्हेगारी आणि दहशतवाद यांच्यातील दुवे शोधून ते नष्ट करण्याची गरज व्यक्त केली.

‘गुन्हेगारी आणि दहशतवाद यांचा संबंध तोडून टाकणे अत्यावश्‍यक आहे. संघटित गुन्हेगार दहशतवादाकडे वळून आमच्या शेजारी देशात कसा राजाश्रय मिळवितात, हे आम्ही पाहिले आहे. या दुटप्पीपणाचा सर्वांनी मिळून प्रतिकार करायला हवा,’ असे कंबोज म्हणाल्या.

विशेष बैठकीसाठी भारताकडून निमंत्रण

दहशतवादविरोधी समितीची ऑक्टोबरमध्ये नवी दिल्ली आणि मुंबईत बैठक होणार असून भारताने त्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमधील सर्व सदस्यांना निमंत्रण दिले आहे. दहशतवाद्यांकडून तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि हल्ला करण्याचे नवे मार्ग या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी समितीचे अध्यक्षपद सध्या भारताकडे आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या या बैठकीसाठी अमेरिका, चीन, रशियासह सुरक्षा समितीमधील १५ सदस्य देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. दहशतवाद पसरविण्यासाठी इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर वाढत असून त्यामुळे अनेक देशांसमोर त्यामुळे नवे आव्हान निर्माण झाले आहे, असे भारताच्या प्रतिनिधी रुचिरा कंबोज आज म्हणाल्या.

पाकिस्तानचा दुटप्पीपणा

भारताच्या प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी पाकिस्तानचे नाव न घेता त्यांचा दुटप्पीपणा उघड केला. १९९३ मधील मुंबई बाँबस्फोटांतील सूत्रधार दाऊद इब्राहिम कासकर हा कराचीमध्ये लपून बसल्याचा भारताचा दावा आहे. पाकिस्तानने दाऊदला भारताच्या हवाली करावे, जेणेकरून त्याला कायद्याच्या मार्गाने योग्य शिक्षा देता येईल, असे भारताचे म्हणणे आहे. अमेरिकेनेही २००३ मध्ये जागतिक दहशतवादी म्हणून जाहीर केले आहे. दाऊद पाकिस्तानात असल्याचा दावा पाकिस्तान सरकारने वारंवार हा दावा अमान्य केला असला तरी ऑगस्ट २०२० मध्ये त्यांनी बंदी असलेल्या देशातील ८८ दहशतवादी संघटना आणि त्यांच्या प्रमुखांची यादी जाहीर केली, त्यात दाऊदचे नाव होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com