दाऊदसंदर्भातील या चर्चेमुळं पाकचा खोटारडेपणा पुन्हा चव्हाट्यावर!

वृत्तसंस्था
Saturday, 6 June 2020

- दाऊदचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे

-  दाऊद इब्राहिमला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते.

इस्लामाबाद : 1993 मध्ये मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटाच्या घटनेनंत देशसोडू पसार झालेला  गँगस्टर दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद हा पाकिस्तानात वास्तव्यास असलेल्या आरोप पाकिस्तानकडून नेहमीच फेटाळण्यात आले आहेत. मात्र दाऊद इब्राहिम आणि त्याची पत्नी महजबीन यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्तानंतर पाकिस्तानचा खाटारडेपणा पुन्हा चव्हाट्यावर आलाय. दाऊदसह त्याच्या पत्नीला पाकिस्तानमधील कराचीतील लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. दरम्यान कोरोनाची लागण झालेल्या दाऊदचा मृत्यू झाल्याची चर्चाही जोर धरु लागली आहे. यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती अदयाप समोर आलेली नाही. पाकिस्तान नेहमीच दाऊद आपल्या देशात नसल्याचे सांगत आला आहे. त्यामुळे यासंदर्भातील अधिकृत माहिती त्यांच्याकडून जाहीर होणे कठिणच आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानातील कराचीमधील लष्करी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आता या रुग्णालयात त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या सीरिअल बॉम्बस्फोटप्रकरणी दाऊद इब्राहिम गेल्या अनेक वर्षांपासून फरार आहे. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून दाऊद इब्राहिम आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त येत होते. पण दाऊदचा भाऊ अनीस याने दाऊद आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त फेटाळून लावले. तसेच अनिसने दाऊद किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचे सांगितले. याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कराचीत आहे उपचार सुरु

दाऊदला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. याशिवाय त्याच्यावर कराचीतील रुग्णालयात सध्या कोरोनावर उपचार केले जात आहेत. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

अधिकृत माहिती नाहीच

दाऊदच्या मृत्यूची बातमी न्यूज एक्सच्या सूत्रांच्या माहितीनुसार दिली आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.  

सर्व जण सुरक्षित

याबाबत अनिस इब्राहिमने सांगितले की, 'दाऊदच्या कुटुंबातील सर्वजण सुरक्षित असून, कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही. सर्वजण घरात सुरक्षित आहेत.

अनीस चालवतो दाऊदचा व्यवसाय

आयएएनएस या वृत्तसंस्थेनुसार, दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम याने एका अज्ञात ठिकाणाहून फोनवरून सांगितले, की आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य ठिक आहेत. कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही. अनिस सध्या युएईमध्ये आलिशान हॉटेल आणि पाकिस्तानात मोठा कंस्ट्रक्शन प्रोजेक्टसह ट्रान्सपोर्ट व्यवसाय चालवतो. 

मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार

दाऊद इब्राहिम 1993 मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मास्टरमाइंड आहे. सलग 13 साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यामध्ये 350 हून जणांचा मृत्यू झाला होता. तर 1200 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. भारत सरकारने 2003 मध्ये अमेरिकेसोबत मिळून दाऊदला ग्लोबल टेररिस्ट म्हणून घोषित केले.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Underworld Don Dawood Ibrahim death speculation due to coronavirus infection in karachi