कोरोना संसर्गाचा फटका २० लाख मुलांना शक्य; युनिसेफच्या पाहणीत निष्कर्ष 

वृत्तसंस्था
Monday, 23 November 2020

युनिसेफने १४० देशांमध्ये पाहणी केली. कोरोनाच्या जागतिक संसर्गाचा मुलांसाठीचा धोका कमी होण्याऐवजी वाढला आहे. अनेक देश या संसर्गामुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत, असे या पाहणीतून दिसून आले. 

न्यूयॉर्क - जगभरातील कोरोनाच्या संसर्गाचा परिणाम मुलांवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. पुढील वर्षातही अशीच स्थिती कायम राहिली तर त्याचा फटका लशीकरणाला बसून किमान २० लाख मुलांचा मृत्यू होऊ शकतो, असा इशारा, युनायडेट नेशन्स चिल्ड्रन्स फंडने (युनिसेफ) दिला आहे. 

जगभरातील करोनाचं संकट अजूनही ओसरलेलं नाही. अनेक देशांमध्ये करोनाची दुसरी लाट आली असून, याचा मोठा परिणाम मुलांवर झाल्याचं युनिसेफनं म्हटलं आहे. करोनाचं संकट पुढच्या वर्षात कायम राहणार असल्याचं चित्र असून, करोनाचा प्रभाव कायम राहिल्यास एका संपूर्ण पिढीचं भविष्य धोक्यात येईल, असा इशारा युनिसेफने दिला आहे. 

युनिसेफने १४० देशांमध्ये पाहणी केली. कोरोनाच्या जागतिक संसर्गाचा मुलांसाठीचा धोका कमी होण्याऐवजी वाढला आहे. अनेक देश या संसर्गामुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत, असे या पाहणीतून दिसून आले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सध्याच्या पिढीपुढे तीन प्रकारचे धोके उद्भवल्याचे पाहणीतून दिसून आले आहे. त्यात कोरोनाच्या संसर्गाचे शारीरिक व मानसिक परिणाम, आवश्यक सेवांमध्ये पडलेला खंड आणि वाढती गरिबी व वाढती विषमता हे ते धोके असल्याचे युनिसेफचे म्हणणे आहे. वाढती गरिबी हा सर्वांत मोठा धोका मुलांसमोर असल्याचे युनिसेफचे म्हणणे आहे. 

कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे लशीकरणातही अडथळे येण्याची शक्यता आहे. जर वेळेत लशीकरण आणि आरोग्याशी निगडीत सेवांमध्ये सुधारणा केली नाही, तर जवळपास २० लाख मुलांचा पुढील १२ महिन्यांमध्ये मृत्यू होण्याचा धोका आहे. तसेच कोरोना संसर्गामुळे युवा पिढीची काम करण्याची क्षमता कमी होऊ शकते, असा इशाराही युनिसेफने दिला आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आरोग्य सेवांत घट 
जगातील एकतृतीयांश देशामधील आरोग्य सेवांमध्ये दहा टक्के घट झाली आहे. नियमित लशीकरण, बाह्यरुग्णांची देखभाल, गर्भवतींसाठी आरोग्य सेवा यावरही परिणाम झाला असल्याचे युनिसेफने म्हटले आहे. घरोघरी जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या भेटींमध्येही मागील वर्षीच्या तुलनेत घट झाल्याचे ६५ देशांमध्ये आढळून आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UNICEF survey Corona infection hits 2 million children