ब्रेक्झिट व्यापार करार पूर्ण; ब्रिटनच्या पंतप्रधानांनी केलं जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 24 December 2020

ब्रेक्झिटच्या चार वर्षानंतर ब्रिटन आणि यूरोपीय महासंघातील व्यापार करार पूर्ण झाला आहे.

लंडन- ब्रेक्झिटच्या चार वर्षानंतर ब्रिटन आणि यूरोपीय महासंघातील व्यापार करार पूर्ण झाला आहे. ब्रिटिनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी स्वत: ट्विट करुन याची माहिती दिली आहे. 

आता ब्रिटेन यूरोपीय एकल बाजाराचा भाग राहणार नाही. आधी यूरोपीय महासंघात समावेश असलेल्या देशांना समान कर आणि व्यापारी नियम-कायदे लागू व्हायचे. या महिन्यातील सखोल चर्चेनंतर हा करार होऊ शकला आहे. 

ड्राफ्टच्या मसुद्याला अंतिम स्वरुप दिले जात असल्याची माहिती यूरोपीय महासंघाच्या प्रवक्त्याने दिली आहे. समुद्रातील माशांची शिकार हा एकमेव मुद्दा आहे, ज्याच्यावर एकमत होणे बाकी आहे. 

ब्रिटनने जून 2016 मध्ये जनमत चाचणी घेऊन यूरोपीय संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. याला ब्रेक्झिट असं नावं देण्यात आलं होतं. मार्च 2017 मध्ये तत्कालीन पंतप्रधान थेरेसा मे यांनी ब्रेक्झिटची अधिसूचना जारी करत यावर पुढे जाण्याचा निर्णय घेतला होता. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The United Kingdom says Brexit trade deal is done

Tags
टॉपिकस
Topic Tags: