पाकिस्तानात मिसाईल पडल्यानंतर अमेरिकेने घेतली भारताची बाजू, म्हणाले...

Joe Biden and Narendra Modi
Joe Biden and Narendra ModiSakal

पाकिस्तानने अलीकडेच भारतावर आपल्या हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. भारताच्या बाजूने आलेलं मिसाईल पाकिस्तानात 124 किलोमीटरच्या आत खानवाल जिल्ह्यात पडल्याचा दावा करण्यात आला होता. (Indian Missile falls in Pakistan Soil)

मात्र, तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडल्याचे भारताने स्पष्ट केले होते. आता अमेरिकाही भारताच्या बाजूने आली आहे. ही केवळ अपघाती घटना असल्याचं अमेरिकेने म्हटले आहे, हा मुद्दाम केलेला हल्ला नव्हता, असं म्हणत अमेरिकेने भारताची बाजू घेतली आहे. यावर स्पष्टीकरणही देण्यात आलंय.

Joe Biden and Narendra Modi
भारतीय क्षेपणास्त्र पडल्यानंतर आम्ही उत्तर दिले असते पण... : पाक PM इम्रान खान

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. हे जाणूनबुजून करण्यात आल्याचे आमच्याकडे कोणतेही संकेत नाहीत, भारतानेही हा अपघात असल्याचं म्हटलं आहे. भारताने शुक्रवारी क्षेपणास्त्र डागल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता. मात्र हे चुकून झालेलं असून हा निव्वळ अपघात असल्याचं स्पष्टीकरण भारताने दिलं होतं. तांत्रिक बिघाडामुळे हे झाल्याचं सांगण्यात आलं.

Joe Biden and Narendra Modi
भारताचं मिसाईल पडलं पाकमध्ये; खेद व्यक्त करुनही संयुक्त तपासाची मागणी

आम्हीही प्रत्युत्तर दिलं असतं - इम्रान खान

चार दिवसांपूर्वी भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात चुकून पडले होते. त्याला संरक्षण मंत्रालयाने देखील दुजोरा दिला. यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानात भारतीय क्षेपणास्त्र पडल्यानंतर आम्हीही भारताला प्रत्युत्तर देऊ शकलो असतो, असं त्यांनी म्हटलं.

पाकिस्तानने काल शनिवारी म्हटलंय की, आमच्या पंजाब प्रांतात पडलेल्या मिसाईलमुळे झालेल्या नुकसानीबााबत भारताने दिलेल्या सरळसोट स्पष्टीकरणामुळे ते समाधानी नाहीये. या घटनेची सखोल चौकशी होण्यासाठी तसेच संबंधित तथ्यांचा योग्य शोध घेण्यासाठी संयुक्त चौकशीची मागणी पाकिस्तानने केली आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय की, पाकिस्ताने भारताच्या माहिती कार्यालयाकडून आलेल्या वक्तव्याचा अभ्यास केला आहे. यामध्ये भारताने ९ मार्च रोजी पाकिस्तानी भागामध्ये पडलेल्या भारतीय मिसाईलमधील तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या या दुर्घटनेबाबत खेद व्यक्त केला आहे. तसेच एका उच्च स्तरिय कोर्ट ऑफ इन्क्वायरीची मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com