अमेरिकेत दरवर्षी तोडले जात आहेत 36 दशलक्ष वृक्ष

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

इकडे मुंबईत आरे कॅालनीतील वृक्षतोडीमुळे मोटा वादंग निर्माण झाला आहे.

लॅास एंजिलस : मनुष्याकडून होणारा पर्यावरणाचा -हास आता पराकोटीला पोचला असून अमेरिकेतील शहरांत तर  दरवर्षी तब्बल 36 दशलक्ष वृक्ष तोडले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इकडे मुंबईत आरे कॅालनीतील वृक्षतोडीमुळे मोटा वादंग निर्माण झाला आहे. त्यामुळे एकदंरीत जगभरात सर्वीकडेच वृक्षतोड ही एक चिंताजनक बाब बनली असून हे असे सुरू राहिल्यास पर्यावरणाच्या हानीसह आपणा सर्वांनाच मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागणार आहे.

अमेरिकेच्या एका एजन्सीने प्रकाशित केलेल्या अहवालात समोर आलेल्या माहितीनुसार दरवर्षी शहरात तब्बल 36 दशलक्ष वृक्षांची तोड केली जाते. यामुळे दरदिवशी तापमानात देखील वाढ होत आहे. या सर्व वृक्षतोडीचे मुख्यकारण हे शहरीकरण आहे. अमेरिकेतील सर्वाधिक लोक हे शहरी भागात राहतात तसेच ग्रामीण भागातही लोकांची संख्या वाढत असून त्यांच्या सोयीसाठी शहर आणि ग्रामीण भागाला जोडणारे रस्ते तयार केले जात आहेत. तसेच लोकांना रहाण्यासाठी किंवा फार्म हाऊस इत्यांदी बांधण्यासाठी वृक्षांची मोठ्या प्रमाणात  तोड करावी लागते. यामुळेच मागील काही वर्षात अमेरिकतील वृक्ष मोठ्या प्रमाणात तोडण्यात येत असून त्यामुळे वृक्षांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.

अशाप्रकारे एक विकसित देश म्हणून ओळख असणा-या अमेरिकतच इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा -हास होत असल्याने इतर विकसनशील देशांची परिस्थिती
देखील बिकट असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या पर्यावरणाच्या हानीला
रोखण्याकरीता वृक्षतोड थांबविणे ही काळाची गरज बनली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the United States 36 million trees are being cut every year