संयुक्त राष्ट्रसंघाच्या दहशतवाद्यांच्या यादीत पाकिस्तान अव्वल 

वृत्तसंस्था
Wednesday, 4 April 2018

139 दहशतवाद्यांपैकी काही पाकिस्तानचे नागरिक आहेत, तर काही पाकिस्तानातून दहशतवादी कारवाया करतात किंवा तेथील लोकांशी, समुहांशी संबंधित असतात.

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने दहशतवाद्यांची यादी जाहिर केली आहे. यात 139 दहशतवादी हा पाकिस्तानातील असून, सर्वाधिक हे लष्करे तैयबा व जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचे आहेत, असे पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने प्रसिद्ध केले आहे. 

या 139 दहशतवाद्यांपैकी काही पाकिस्तानचे नागरिक आहेत, तर काही पाकिस्तानातून दहशतवादी कारवाया करतात किंवा तेथील लोकांशी, समुहांशी संबंधित असतात. या यादीत मुंबईतील 26/11 च्या हल्ल्याचा सूत्रधार हाफीझ सईद हाही आहे. हाफीज सईद हा लष्करे तैयबाचा संस्थापक आहे. तसेच हाजी मोहम्मद याहा मुजाहीद हा लष्करे तैयबाचा संपर्क प्रमुख व अब्दुल सलाम, झफर इक्बाल ही याच संघटनेतील नावे या यादीत आहेत. 

या शिवाय या यादीत, अल् मन्सुरियन, पास्बानी काश्मिर, पास्बानी आहले हादित, जमात-उद्-दावा आणि फलाही इन्सानियत या दहशतवादी संघटनांची नावे सुरक्षा परिषदेने जाहिर केली आहेत. कालच संयुक्त राष्ट्रसंघाने हाफीज सईदच्या मिली मुस्लीम लीग या राजकीय पक्षाचा या यादीशी संबंधित उल्लेख केला होता. 

या यादीत पहिल्या क्रमांकात अल्-कायदाचा आयमान अल् जवाहीरी आहे, जो 9/11 च्या हल्ल्यातील ओसामा बिन लादेनसह सूत्रधार होता. दुसऱ्या क्रमांकावर येमेनचा राझमी मोहम्मद बिन अल् शेईबा हा आहे, तो कराचीमध्ये काही दिवसांपूर्वी पकडला गेला व त्याला अमेरिकेच्या ताब्यात देण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UN's terror list has many Pakistan terrorist