कॅलिफोर्निया हादरले भूकंपाने; 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद

वृत्तसंस्था
शनिवार, 6 जुलै 2019

कोणतीही जीवितहानी नाही

या भूकंपात आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणी गंभीर जखमी झालेले नाही, अशी माहिती पोलिसप्रमुख जेड मॅकलॉइन दिली.

कॅलिफोर्निया : कॅलिफोर्नियाच्या दक्षिण भागात आज (शनिवार) मोठा भूकंप झाला. हा भूकंप 7.1 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा असल्याची नोंद झाली आहे. 20 वर्षांतील सर्वांत मोठ्या तीव्रतेचा भूकंप आज झाला. 

कॅलिफोर्नियातील रिजरक्रेस्ट या शहराजवळ जमिनीपासून 900 मीटर खोलीवर या भूकंपाचे केंद्र होते. हे केंद्र लॉस एंजल्सपासून ईशान्येस 240 किमी अंतरावर आहे. याबाबत भूकंपशास्त्रज्ञ डॉ. ल्युसी जोन्स यांनी सांगितले, की रिजरक्रेस्ट या शहराजवळ भूकंपाचे केंद्र आहे. या भागात भूकंपाच्या धक्क्यांची मालिका आहे. या भूकंपाचे धक्के आणखी काही काळ जाणवतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, अशा प्रकारचे किंवा त्यापेक्षाही अधिक तीव्रतेचा भूकंप पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे, असे भूकंपशास्त्रज्ञ डॉ. ल्युसी जोन्स यांनी सांगितले.

कोणतीही जीवितहानी नाही

या भूकंपात आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणी गंभीर जखमी झालेले नाही, अशी माहिती पोलिसप्रमुख जेड मॅकलॉइन दिली.

काही ठिकाणी आग

या शहरात झालेल्या भूकंपानंतर काही ठिकाणी आग लागण्याची घटना घडली आहे. आपात्कालीन यंत्रणांना याबाबतची माहिती देण्यात आली असून, त्यांच्याकडून मदतकार्य सुरु आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US 7 Magniude Earthquake Recorded in Southern California