

US Air Force Cyber Attack
esakal
Washington: अमेरिकेच्या हवाई दलाच्या अत्यंत महत्त्वाच्या ‘क्लाउड वन’ (Cloud One) संगणकीय यंत्रणेत हॅकर्सनी घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. या प्लॅटफॉर्मवर लष्करी कर्मचाऱ्यांची माहिती, विमानांची देखभाल, रसद व्यवस्थापन आणि क्षेपणास्त्रांच्या नोंदी असलेली यंत्रणा कार्यरत आहे. या घटनेची गंभीर दखल घेत अमेरिकी लष्कराच्या सायबर कमांडला तपासासाठी पाचारण करण्यात आले आहे.