esakal | ट्रम्प यांच्याविरोधातील दुसऱ्या महाभियोगास सुरवात; आजपासून होतेय सुनावणी

बोलून बातमी शोधा

Donald Trump}

त्यांच्यावर कॅपिटॉल हिलवर झालेल्या हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

ट्रम्प यांच्याविरोधातील दुसऱ्या महाभियोगास सुरवात; आजपासून होतेय सुनावणी
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सीनेटमध्ये दुसऱ्यांदा महाभियोग राबवण्याची प्रक्रिया मंगळवार दुपारपासून सुरु झाली आहे. त्यांच्यावर कॅपिटॉल हिलवर झालेल्या हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. व्हाईट हाऊसने 56 विरोधात 44 मतांनी त्यांच्याविरोधात ही सुनावणी करण्याचा निर्णय घेतला होता.  6 रिपब्लिकन्सनी देखील ट्रम्प यांच्याविरोधात मत दिलं होतं हे स्पष्ट होतं. डेमोक्रॅटीक पक्षाच्या सदस्यांनी दावा केला आहे की ते डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात काही पुरावे सादर करतील. ज्यामुळे हे सिद्ध होऊ शकेल की 6 जानेवारी रोजी कॅपिटॉल हिलवर झालेल्या हल्ल्याला तेच जबाबदार होते. 

हेही वाचा - पॉर्नस्टार म्हणाली, 'डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचे 90 सेकंद आयुष्यातील सर्वांत वाईट'

डेमोक्रॅटीक पक्षाने ट्रंप यांच्या 6 जानेवारीच्या भाषणाचा व कॅपिटल हल्ल्याच्या व्हीडिओ पुरावा  म्हणून सादर केला. तर ट्रम्प यांच्या वकिलांनी ट्रम्प यांचं हे भाषण या हल्ल्यासाठी जबाबदार नसल्याचा दावा केला आहे. माजी राष्ट्राध्यक्षांवर महाभियोग चालवणं हे  घटनाबाह्य आहे, असं सांगत यामागे डेमोक्रॅट्स हे राजकीय हेतूने प्रेरित होऊन हे करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
 
महाभियोगाची सुरवात
मॅनेजर्सद्वारे एक व्हिडीओ प्रस्तुत करण्यासोबतच महाभियोगाचे परिक्षण सुरु झाले. यात कॅपिटॉलमध्ये 6 जानेवारीच्या दंग्यांचे ग्राफिक इमेजेस देखील होते. काही व्हिडीओ क्लिपमध्ये एका वेळेला 100 सीनेटर आहेत, ज्यांनी कोरोनामुळे मास्क घातला होता. व्हिडीओमध्ये दिसतंय की ते आपल्या जागेवर बसलेत आणि दंगेखोरांना गोंधळ घालताना पाहत आहेत. दरम्यान, अमेरिकेच्या 100 सदस्यांच्या सिनेटमध्ये ट्रंप यांना दोषी ठरवण्यासाठी दोन तृतियांश मत मिळणे गरजेचे आहे. दोन्ही पक्षांना आपापली बाजू मांडायला प्रत्येकी 16 तास मिळतील. हे युक्तिवाद आठवड्याच्या अखेरपर्यंत चालतील. डोनाल्ड ट्रंप यांच्याविरोधात ही सुनावणी सुरू होत असली तरीही त्याचा अंतिम निर्णय काय लागेल हे कुणालाही सांगता येणार नाही, असं चित्र आहे.