esakal | अमेरिका-चीन यांच्यात पुन्हा तणाव; कारण वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

America-and-Chin

वॉल स्ट्रीटची टीका झोंबली 
हाँगकाँगच्या स्वायतत्तेची आणि स्वातंत्र्याची हमी चीन आणि ब्रिटन सरकार यांच्यात झालेल्या करारातून देण्यात आली असून  त्याला धक्का लावणे म्हणजे थेट आमच्या व्यवस्थेला हात लावण्यासारखे आहे  तसेच यामुळे हाँगकाँगच्या स्वातंत्र्याला बाधा आणण्यासारखे असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी म्हटले आहे. फेब्रुवारीत अमेरिकेतील प्रसिद्ध वर्तमानपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने कोरोनावरून चीनवर टीका केली होती.

अमेरिका-चीन यांच्यात पुन्हा तणाव; कारण वाचा सविस्तर

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वॉशिंग्टन - हाँगकाँगमधील चिनी हस्तक्षेपाला अमेरिकेने पुन्हा एकदा आक्षेप घेतल्याने उभय देशांत तणाव निर्माण झाला आहे. कोरोनापाठोपाठ माध्यम स्वातंत्र्य आणि स्वायतत्तेच्या  मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरींना धार चढली आहे.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

हाँगकाँगमधील अमेरिकी पत्रकारांच्या कामात चीन वारंवार व्यत्यय आणत असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. मागील महिन्यात दोन्ही देशांनी परस्परांच्या पत्रकारांची  हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पीओ म्हणाले की, " पत्रकार स्वतंत्र असतात.  ते कुणाचाही प्रचार करत नाहीत." तत्पूर्वी चीनने येथे वार्तांकनासाठी आलेल्या बारापेक्षाही अधिक अमेरिकी पत्रकारांची हकालपट्टी केली होती.