Immigration Policy : ट्रम्प प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठाच्या परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेश मान्यतेवर बंदी घातली होती. मात्र, फेडरल न्यायालयाने या आदेशाला तातडीने स्थगिती दिली असून हार्वर्डला दिलासा मिळाला आहे.
न्यूयॉर्क : जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठाला दिलेला निधी रोखणाऱ्या अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने आज या विद्यापीठाची परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी आवश्यक असणारी मान्यताच रद्द केली.