esakal | मॉडर्नाच्या लशीने डॉक्टरला ॲलर्जी; अमेरिकेत लसीकरणानंतरची पहिली घटना
sakal

बोलून बातमी शोधा

moderna vaccine

कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन समोर आल्याने सध्या जगभरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मॉडर्नाच्या लशीने डॉक्टरला ॲलर्जी; अमेरिकेत लसीकरणानंतरची पहिली घटना

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

न्यूयॉर्क, ता. २६ : कोरोनावरील मॉडर्नाची लस घेतलेल्या बोस्टनमधील एका डॉक्टरला त्याचे तीव्र दुष्परिणाम जाणवू लागले. कवच असलेल्या जलचर प्राण्यांच्या सेवनानंतर एखाद्याला त्याची ॲलर्जी (शेलफिश ॲलर्जी) जाणवते, तशी ॲलर्जी ही लस गुरुवारी (ता. २४) घेतल्यानंतर डॉक्टरांमध्ये निर्माण झाली, अस वृत्त ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिले आहे. बोस्टन मेडिकल सेंटरमधील वृद्धांचे कर्करोगचिकित्सक डॉ. होसेन सदरझादेह यांनी ही लस घेतल्यानंतर त्यांना लगेचच चक्कर आल्यासारखे झाले. हृदयाचे ठोकेही जलदगतीने पडू लागले, अशी माहिती दिल्याचे या वृत्तात म्हटले आहे. अमेरिकेत मॉडर्नाची लस देण्यास एक आठवड्यापासून सुरवात झाली आहे. लशीचा डोस घेतल्यानंतर अशी तीव्र लक्षणे आढळलेली ही पहिलीच घटना आहे. बोस्टन मेडिकल सेंटरचे प्रवक्ते डेव्हिड किब्बे म्हणाले की, डॉ. सदरझादेह यांना लस घेतल्यानंतर ॲलर्जी जाणवू लागली. त्‍यांना जाणवलेल्या दुष्परिणामांची तपासणी स्वतःची करण्याची परवानगी डॉक्टरांना देण्यात आली. आपत्कालीन विभागात त्यांच्या ॲलर्जीची पाहणी करून त्यांच्यावर उपचार केले. काही वेळ निरीक्षणाखाली ठेवून त्यांना सोडण्यात आले असून आता त्यांना बरे वाटत आहे.

हेही वाचा - युरोपातील आठ देशांमध्ये सापडला कोरोनाचा नवा स्ट्रेन; WHO ने दिली माहिती

चौकशी करण्याचे आश्‍वासन
अमेरिकेत फायझर आणि बायोएनटेक एसईच्या लसीकरणानंतर काही जणांमध्ये पाच प्रकारचे दुष्परिणाम दिसून आले आहेत. त्याची चौकशी करणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते.

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे दहशत

कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन समोर आल्याने सध्या जगभरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. युरोपातील जवळपास आठ देशांमध्ये आतापर्यंत कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे.  जागतिक आरोग्य संघटनेने याबाबतची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी म्हटलंय की त्यांचं प्राप्त परिस्थितीवर लक्ष आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे युरोपचे प्रमुख हंस क्लूगे यांनी म्हटलंय की मागच्या स्ट्रेनच्या तुलनेत कोरोनाचा हा नवा स्ट्रेन वेगाने तरुणांमध्ये पसरतो आहे. त्यामुळे खबरदारी बाळगणे, खूपच आवश्यक आहे. या नव्या स्ट्रेनचा परिणाम काय आणि कशापद्धतीने होतो, याबाबतचे संशोधन सध्या सुरु आहे. 

loading image
go to top