डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, 'लष्करी सामर्थ्याच्या बळावर शांतता टिकवून ठेवेन'

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 25 September 2020

डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडामधील जॅक्सनव्हॅली इथे झालेल्या या सभेला तीस हजारांहून अधिक समर्थक उपस्थित होते.

वॉशिंग्टन- जगभरात सुरु असलेल्या आणि कधीही न संपणाऱ्या ‘तथ्यहिन’ युद्धांपासून अमेरिका भविष्यात दूरच राहणार आहे, आम्ही आमचे परदेशांमधील सैनिक माघारी बोलावणार आहोत, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केली. मात्र, अमेरिकेला धोकादायक ठरणाऱ्या दहशतवाद्यांना नामोहरम करतानाच देशाच्या अतुलनीय लष्करी सामर्थ्याच्या बळावर शांतता टिकवून ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

कोरोनाविरोधातील लढ्यासाठी 'कॉफी विद कलेक्टर' ; नॉयडाच्या...

फ्लोरिडा येथील एका निवडणूक सभेत बोलताना ट्रम्प यांनी ही घोषणा केली. ‘अनेक दशकांपासून अमेरिकेच्या नेत्यांनी इतर देशांची बांधणी करण्यात, युद्ध करण्यात आणि दुसऱ्या देशांच्या सीमांचे रक्षण करण्यात हजारो अब्ज डॉलर खर्च केले. आता मात्र आपण आपली शहरे विकसीत करणार आहोत, आपल्या देशाचे संरक्षण करणार आहोत. आपण नोकऱ्या, कंपन्या, उद्योग आणि सैनिक यांना परत अमेरिकेत आणणार आहोत,’ असे ट्रम्प भाषणादरम्यान म्हणाले. आपण दहशतवाद्यांनाही हरवू आणि त्यांना देशाच्या बाहेरच ठेवू. कधीही न संपणाऱ्या आणि तथ्यहिन असणाऱ्या युद्धांपासून आपण स्वत:ला आता दूर ठेवू, असेही ट्रम्प म्हणाले.

सोशल डिस्टन्सिंगला फाटा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडामधील जॅक्सनव्हॅली इथे झालेल्या या सभेला तीस हजारांहून अधिक समर्थक उपस्थित होते. ही त्यांची आतापर्यंतची सर्वांत मोठी सभा मानली जात आहे. या सभेत सोशल डिस्टन्सिंग, मास्क वगैरे गोष्टींकडे साफ दुर्लक्ष झाले होते. समर्थकांच्या या पाठिंब्याने भारावून गेलेल्या ट्रम्प यांनी या सर्वांचा उल्लेख ‘देशभक्त’ असाही केला. आपल्या सभांना मोठी गर्दी होत असताना प्रतिस्पर्धी असलेल्या ज्यो बायडेन यांना मात्र लोकांना गोळा करण्यासाठी बरेच कष्ट करावे लागत आहेत, असा टोलाही ट्रम्प यांनी लगावला.

शेतकऱ्यांना अफवांपासून वाचवण्याची जबाबदारी भाजप कार्यकर्त्यांची- नरेंद्र मोदी 

दरम्यान, अमेरिकेत 3 नोब्हेंबर रोजी अध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चुकशीचा सामना पाहायला मिळणार आहे. अनेक जनमत चाचण्यांमध्ये जो बायडेन यांचा विजय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, 2016 साली हिलरी क्लिंटन यांचा विजय होईल असा अंदाज बांधला जात होता. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्याने सगळ्यांनाच आर्श्चर्याचा धक्का बसला होता. त्यामुळे या निवडणुकीत काय निकाल लागतो, याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us election Donald trump said will keep peace with army power