esakal | US Election: डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहिणीने त्यांच्यावर केले गंभीर आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

donald trump and his sister1.jpg

अमेरिकेतील निवडणुका (us election) जवळ आल्या असताना डोनाल्ड ट्रम्प (donald trump) यांच्या मोठ्या बहिणीने आपल्या भावावर गंभीर आरोप केले आहेत

US Election: डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहिणीने त्यांच्यावर केले गंभीर आरोप

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन-अमेरिकेतील निवडणुका (us election) जवळ आल्या असताना डोनाल्ड ट्रम्प (donald trump) यांच्या मोठ्या बहिणीने आपल्या भावावर गंभीर आरोप केले आहेत. ट्रम्प यांची बहीण मरयाने ट्रम्प बैरी (Maryanne Trump Barry) यांनी एका गुप्त पद्धतीने रिकॉर्ड करण्यात आलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये ट्रम्प यांचा कोणताही सिद्धात नसल्याचं म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही. ट्रम्प यांनी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळादरम्यान अनेकदा खोटं बोललं असल्याचं मरयाने यांनी म्हटलं आहे. ही ऑडिओ रिकॉर्डींग बाहेर आल्याने अमेरिकेतील राजकीय वातावरण तापलं आहे.

पुतीन यांना धडकी भरवणारा रशियाचा नेता कोण?
 

मरयाने (वय ८३) यांनी फसवणूक केल्याप्रकरणी ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. ट्रम्प यांची प्रवाशांसंबंधी असलेली नीती निर्दयी आहे. यामुळे हजारो मुलांना आपल्या कुटुंबीयांना सोडून वेगळ्या केंद्रामध्ये रहावं लागत आहे. डोनाल्ड ट्रम्प निर्दयी आहेत, असं त्या म्हणाल्या आहेत. ट्रम्प यांच्या बहिणीच्या या गुप्त ऑडिओ रिकॉर्डींगला वॉशिंग्टन पोस्ट या वृत्त संस्थेने जाहीर केलं आहे. मरयाने यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या बुद्धीमत्तेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

मरयाने यांनी आपली भाची मैरी ट्रम्प यांच्यासमोर २०१८ साली आश्चर्यकारक खुलासे केले होते. यावेळी मैरी ट्रम्प यांनी याचे गुप्त पद्धतीने रिकॉर्डींग केले. यानंतर मैरी यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत असलेले नाते तोडले होते. ३ नोव्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होत आहे. अशात ही रिकॉर्डींग बाहेर आल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. कुटुंबीयांनाच ट्रम्प त्यांच्यावर विश्वास नसल्याने त्यांच्या क्षमतांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

अरबस्तानातले बदलते रिश्‍तें (श्रीराम पवार)

डोनाल्ड ट्रम्प बेभरवशाचे

यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्या परिवारातील कोणत्याही सदस्याने सार्वजनिकरित्या राष्ट्रपती किंवा त्यांच्या नीतींबाबत टीका केली नव्हती. डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वीच आपल्या भावाच्या अंतिम संस्काराचे आयोजन केले होते. यावेळी मरयाने उपस्थित नव्हत्या. त्यानंतर ट्रम्प यांच्या बहिणीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि मरयाने यांच्या संबंधात वाईटपणा असल्याचं दिसत आहे.

मैरी ट्रम्प यांनी समोर येत या ऑडिओ क्लिपला सर्वांसमोर ठेवलं आहे. जवळजवळ १५ तासांच्या ऑडिओ क्लिपमध्ये २०१८ ते २०१९ दरम्यानची रिकॉर्डींग करण्यात आली आहे. यामध्ये मरयाने यांनी आरोप केला आहे की, ट्रम्प यांचा कोणताही सिद्धांत नाही. ट्रम्प केवळ आपली जागा मजबूत करण्यासाठी राजनैतिक पाऊलं उचलत आहे. या ऑडिओ क्लिपमुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे.

(edited by-kartik pujari)