अमेरिकन निवडणुकांचं बिगुल वाजलं; पहिल्या डिबेटची तारीख आली

टीम ई सकाळ
Tuesday, 28 July 2020

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना अमेरिकेत मात्र निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. निवडणुकीसाठी पहिली डिबेट २९ सप्टेंबर रोजी ओहियोमध्ये पार पडणार आहे. कमिशन ऑफ प्रेसिडेन्शिअल डिबेट्सनं सोमवारी याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाचा फटका जगात सर्वाधिक अमेरिकेला बसला असतानाही अमेरिकेत राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीचं बिगुल जोरात वाजलं आहे.

वॉशिंग्टन : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना अमेरिकेत मात्र निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. निवडणुकीसाठी पहिली डिबेट २९ सप्टेंबर रोजी ओहियोमध्ये पार पडणार आहे. कमिशन ऑफ प्रेसिडेन्शिअल डिबेट्सनं सोमवारी याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाचा फटका जगात सर्वाधिक अमेरिकेला बसला असतानाही अमेरिकेत राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीचं बिगुल जोरात वाजलं आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

क्लिव्हलँडच्या केस वेस्टर्न विद्यापीठ आणि क्लिव्हलँड क्लिनिक ही डिबेट होस्ट करणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. २९ सप्टेंबर रोजी हेल्थ एज्युकेशन कँपसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेट्सचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्षे जो बायडेन यांच्यादरम्यान थेट डिबेट होणार आहे. दोन्ही नेते १५ ऑक्टोबर रोजी फ्लोरिडातील मायामीमध्ये पुन्हा एकमेंकासमोर येणार आहे. तर तिसरी डिबेट २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. अशा एक महिन्याच्या अंतरात तीन डिबेट थेट होणार आहेत.

दरम्यान, उप-राष्ट्राध्यक्षपदासाठी अमेरिकेत ७ ऑक्टोबर रोजी पहिली डिबेट होणार आहे. सॉल्ट लेक सिटी विद्यापीठात पार पडणाऱ्या या डिबेटमध्ये उप-राष्ट्राध्यक्ष माईक पेंस हे डेमोक्रेट्रिक पक्षाच्या उमेदवारासमोर येणार आहे. सध्या डेमोक्रेटिक पक्षाकडून आपल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. या सर्व डिबेट ९० मिनिटांच्या असतील. तसंच या रात्री ९ ते १०.३० दरम्यान होणार आहे. या सर्व डिबेट्सचं अमेरिकेत थेट प्रक्षेपणही करण्यात येणार आहे.

राष्ट्रपतीपदासाठी होणाऱ्या डिबेट
पहिली डिबेट : २९ सप्टेंबर क्विव्हलँडमध्ये
दुसरी डिबेट : १५ ऑक्टोबर मायामीमध्ये
तिसरी डिबेट : २२ ऑक्टोबर नॅशविलेमध्ये

उपराष्ट्रपतीपदासाठी होणाऱ्या डिबेट
पहिली डिबेट : ७ ऑक्टोबर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US Election First presidential debate to be held in Cleveland on Sept 29