'We Did It Joe', बायडेन यांना कमला हॅरिस यांचा कॉल; शेअर केला VIDEO

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 November 2020

विजयानंतर डेमोक्रेटिक पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस (Kamla Harris) यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये कमला हॅरिस यांनी ज्यो बायडेन यांचे अभिनंदन केलं आहे. 

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या  (US Election 2020) निवडणुकी ज्यो बायडेन (Joe Biden) यांनी विजय मिळवला आहे. 270 इलेक्टोरल मतांचा आकडा गाठून बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प (Donald Trump) यांना पराभूत केलं. विजयानंतर डेमोक्रेटिक पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस (Kamla Harris) यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये कमला हॅरिस यांनी ज्यो बायडेन यांचे अभिनंदन केलं आहे. बायडेन तुम्ही करून दाखवलं. तुम्ही अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष असणार आहात अशा शब्दात कमला हॅरिस यांनी बायडेन यांचे अभिनंदन केले.

गेल्या दोन तीन दिवसांपासून मतमोजणीवरून अमेरिकेच्या निवडणुकीच्या निकालाची प्रतिक्षा लांबली होती. ट्रम्प यांना मतमोजणीत गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला होता. अखेर न्यायालयाने असं काही होत नसल्याचा निर्णय दिला.

बायडेन यांनी 274 इलेक्टोरल मते मिळवून विजयावर शिक्कामोर्तब केलं. ट्रम्प यांना 214 इलेक्टोरल मतेच मिळवता आली. अमेरिकेच्या जनतेनं गेल्या तीस वर्षात पहिल्यांदाच एखाद्या राष्ट्राध्यक्षाला दुसरी संधी नाकारली आहे. याआधी 1992 मध्ये जॉर्ज एच डब्ल्यू बुश यांना दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होता आलं नव्हतं. 

मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. यामध्ये मतमोजणीवर आक्षेप घेत ट्र्म्प न्यायालयात पोहोचले होते. मात्र तिथे त्यांनाही धक्का बसला. शुक्रवारी बायडेन यांनी जॉर्जिया आणि पेन्सिल्वेनियामध्ये आघाडी मिळवली होती. त्यानंतर शनिवारी उर्वरीत मतमोजणी झाल्यानंतर बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Us Election kamala harris call to joe biden after winning presidential election