
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील ५७ देशांना आयातशुल्काचा दणका दिला. चीनवर ३४ टक्के एवढे भरभक्कम आयातशुल्क लागू केल्यानंतर चीननेही शुक्रवारी (ता.४) अमेरिकेवर ३४ टक्के आयातशुल्क लावून ‘जशास तसे’ उत्तर दिले. चीनने प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेवर लावलेल्या ३४ टक्के आयातशुल्कामुळे अमेरिकेतील शेतकरी मात्र चिंतेत पडला आहे.