corona vaccination
corona vaccinationsakal media

Vaccine : लहान मुलांना देण्यात येणाऱ्या लसींबाबत अमेरिका मोठा निर्णय घेणार; आता कोविड लस...

नवी दिल्ली - कोरोना व्हायरस (कोविड-19) ने जगभरातील सामान्य जीवन प्रभावित केले होते. कोरोना व्हायरस (कोरोना व्हायरस) संक्रमणाच्या लाटेमुळे भय निर्माण होते. मात्र कोरोनावरील लसी कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्त्वपूर्ण ठरल्या. जगभरात मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण झालं. मात्र अमेरिका सरकार यापुढे जावून कोरोना लसीबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. s health body recommends adding covid vaccine to routine vaccines for children)

corona vaccination
Cow Hug Day Withdrawn: मोठ्या वादानंतर अखेर केंद्राकडून 'काऊ हग डे'चं आवाहन मागे!

सीएनएनच्या (सीएनएन) एका अहवालानुसार, आता अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (सीडीसी) ने लहान मुलांना आणि बालकांना देण्यात येणाऱ्या नियमित लसीकरणात कोविड लसीचा समावेश करण्याची शिफारस केली आहे. मात्र वेळापत्रकानुसार शाळा किंवा लसीकरण केंद्र याबाबत लसीच्या आवश्यकतेबाबत काहीही स्पष्ट केलेलं नाही.

सीडीसीच्या मॉर्बिडिटी आणि मॉर्टेलिटी वीकली रिपोर्टमध्ये लसीकरण शेड्यूल बदलण्याबाबत शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये इतर लसींच्या शेड्युलमध्ये बदल करण्याचं सुचवल आहे. लसीकरण मोहिमेला लसीकरण सल्लागार समितीने या सूचना केल्या आहेत.

corona vaccination
Satyajeet Tambe : सत्यजित तांबेंच्या विजयानंतर नवा ट्विस्ट; भाजपच्या बड्या नेत्यानं केला मोठा गौप्यस्फोट

एपिडेमिओलॉजिस्ट डॉ नील मूर्ति आणि डॉ. पेट्रीसिया वोडी यांच्या हवाल्याने सीएनने म्हटले की, कोविड-19 लस आता अन्य नियमित देण्यात येणाऱ्या लसींप्रमाणे ही लस देण्यात येईल. यामध्ये पहिली लस आणि बुस्टर डोसचा समावेश असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com