
मस्कत : अणुकार्यक्रमावरून आणखी चर्चा करण्याची गरज आहे, असा निष्कर्ष अमेरिका आणि इराण यांच्या शिष्टमंडळातील चर्चेच्या पहिल्या फेरीमध्ये काढण्यात आला. त्यामुळे, दोन्ही देशांमधील तणावाचा मुद्दा झालेल्या अणुकार्यक्रमावर आणखी चर्चेचा मार्ग खुला झाला असून, आता पुढील आठवड्यातही चर्चा होणार आहे.