Afghanistan
Afghanistan

अमेरिकेने अफगाणिस्तान सोडताच तालिबानची आतशबाजी

Summary

20 वर्षाच्या दीर्घ संघर्षानंतर अखेर अमेरिकेने अफगाणिस्तानमधून आपले सैन्य परत बोलावलं आहे. अमेरिकेच्या शेवटच्या विमानाने अफगाणिस्तान सोडलंय

काबूल- 20 वर्षाच्या दीर्घ संघर्षानंतर अखेर अमेरिकेने अफगाणिस्तानमधून आपले सैन्य परत बोलावलं आहे. अमेरिकेच्या शेवटच्या विमानाने अफगाणिस्तान सोडलंय. त्यामुळे अफगाणिस्तान अधिकृतरित्या अमेरिकी लष्कराच्या वर्चस्वापासून मुक्त झाला आहे. अमेरिकेच्या सैन्य वापसीमुळे तालिबानने आनंद व्यक्त केलाय. तालिबानने म्हटलंय की, अफगाणिस्तान आता पूर्णपणे स्वतंत्र झाला आहे. तालिबानकडून या क्षणाचा जल्लोष साजरा करण्यात आला. आकाशात आतशबाजी आणि हवेत बंदुकीच्या गोळ्या चालवण्यात आल्या. (Afghanistan Latest News)

तालिबानचे प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिद यांनी मंगळवारी म्हटलं की, 'अमेरिकी सैनिकांनी काबूल विमानतळ सोडलं आहे आणि आमच्या देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळालं आहे.' अमेरिकी अधिकाऱ्यांनीही याची पुष्टी केली आहे. अमेरिकेने डेडलाईन संपण्याआधीच अफगाणिस्तान सोडलंय. काही दिवसांपूर्वीच तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला आहे. आता अमेरिकेने सैन्य परत बोलावले असल्याने तालिबानने जल्लोष केला. फटाके फोडण्यात आले आणि हवेत गोळ्या चालवण्यात आल्या.

अमेरिकेच्या शेवटच्या विमानाने अफगाणिस्तान सोडले. त्यानंतर राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी प्रतिक्रिया दिली. अफगाणिस्तानमध्ये गेल्या 20 वर्षांपासून उपस्थित असलेले सैन्य आता परत आले आहे, असं ते म्हणाले. बायडेन यांनी आपल्या सैन्य कमांडरांचे आभार मानले. कोणत्याही जीवितहानीशिवाय अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तानमधून सैन्य परतीचे ऑपरेशन पूर्ण केले आहे.

Afghanistan
सर्वांनी तालिबानशी संवाद साधावा, मार्गदर्शन करावे

अमेरिकेने 14 ऑगस्टनंतर अफगाणिस्तानमधून जवळपास 1 लाख 23 हजार 000 लोकांना बाहेर काढलं आहे. यात अमेरिकी नागरिक, अमेरिकी सहयोगी आणि अमेरिकेला मदत केलेले अफगाण नागरिक यांचा समावेश आहे. असे सांगितलं जातं की, अमेरिकेचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे एअरलिफ्ट मिशन होते. दरम्यान, अमेरिकेच्या सैन्य वापसीमुळे तालिबानचे बळ अधिक वाढणार आहे. तालिबानला देशात इस्लामी शासन निर्माण करायचं आहे. त्यामुळे महिलांवर अनेक निर्बंध लादले जातील. शिवाय येत्या काळात नागरिकांवरील अत्याचाराच्या घटना वाढलेल्या पाहायला मिळणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com