

World on the Brink: America’s Deadliest Warship Moves Near Iran as Tehran Puts Forces on Trigger Alert
esakal
इराण आणि अमेरिका या दोन देशांमधील संघर्षाचे वातावरण अधिक गडद होत चालले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच सांगितले की, इराण चर्चेसाठी येण्यास उत्सुक दिसत आहे. मात्र, या दाव्यानंतर तेहरानने कडक प्रतिक्रिया दिली आहे. सैनिकांच्या बोटा ट्रिगरवर तयार आहेत. या शाब्दिक चकमकीच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे अत्यंत विध्वंसक युद्धनौका US अब्राहम लिंकन इराणच्या सीमेजवळ दाखल झाले आहे. हे जहाज अमेरिकेच्या नौदल शक्तीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे मोठ्या घटनेची शक्यता वर्तवली जात आहे. ट्रम्प यांच्या धमक्यांनुसार, हे युद्धनौका इराणवर दबाव वाढवण्यासाठी पाठवले गेले आहे की त्यामागे काही गंभीर योजना आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.