गुगलविरोधात अमेरिकेचा अविश्‍वासाचा खटला 

पीटीआय
Thursday, 22 October 2020

ॲपल, ॲमेझॉन आणि फेसबुक यांच्यासारख्या आघाडीच्या कंपन्या जस्टिस डिपार्टमेंट आणि फेडरल ट्रेड कमिशनच्या रडारवर आल्या असतानाच आता गुगलच्या देखील नाड्या आवळण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

न्यूयॉर्क - ऑनलाइन सर्च आणि जाहिरात क्षेत्रामध्ये स्वतःच्या प्रभुत्वाचा गैरवापर केल्याप्रकरणी अमेरिकेच्या जस्टिस विभागाने आघाडीचे सर्च इंजिन गुगलविरोधात खटला भरला आहे. ॲपल, ॲमेझॉन आणि फेसबुक यांच्यासारख्या आघाडीच्या कंपन्या जस्टिस डिपार्टमेंट आणि फेडरल ट्रेड कमिशनच्या रडारवर आल्या असतानाच आता गुगलच्या देखील नाड्या आवळण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या बड्या कंपन्यांमधील स्पर्धेत समतोल राहावा यासाठी अमेरिकेच्या प्रशासनाने पुढाकार घेत कारवाईला सुरवात केली आहे. याआधी २० वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्टविरोधात देखील अशाच पद्धतीचा खटला दाखल करण्यात आला होता. इंटरनेट सर्चिंग आणि ऑनलाइन जाहिरात क्षेत्रामध्ये गुगल मोठा गेट वे आहे. या क्षेत्रावर आपलेच प्रभुत्व राहावे म्हणून गुगल काही चुकीच्या पद्धतीचा अवलंब करते, ते स्पर्धेसाठी घातक असल्याचे अमेरिकेचे डेप्युटी ॲटर्नी जनरल जेफ रोझेन यांनी सांगितले. वॉशिंग्टन डीसीमधील फेडरल कोर्टामध्ये हा खटला दाखल करण्यात आला आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मक्तेदारी मारक 
गुगल हे जाहिरातदारांकडून अब्जावधी डॉलर गोळा करून ते फोन निर्मात्या कंपनीला देते. या कंपन्यांनी त्यांच्या ब्राउजरमध्ये गुगलचे सर्च इंजिन ठेवावे हा या मागचा उद्देश असतो. गुगलची ही मक्तेदारी अन्य स्पर्धक कंपन्यांसाठी मारक असल्याचा दावा, सरकारकडून करण्यात आला आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US no-confidence motion against Google